महाराष्ट्र

पनवेल तालुक्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी

प्रवेशबंदी प्रवेशबंदी

 

मराठी सारांश

पनवेल तालुक्यातील गाढेश्वर, मोरबे, देहरंग आणि इतर धरण परिसरात पावसाळी सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांना यंदा प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी विशेष आदेश काढला असून पर्यटकांनी जीवितास धोका टाळण्यासाठी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

English Summary

Tourist entry has been prohibited at popular monsoon destinations like Gadeshwar, Morbe, and Dehrang dams in Panvel taluka due to recurring accidents and safety concerns. DCP Rashmi Nandedkar has issued a special directive urging tourists to avoid these spots and follow safety guidelines.


गाढेश्वर, मोरबे, देहरंगसह अनेक ठिकाणी बंदी

पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेश्वर, देहरंग, मोरबे धरण, वारदोली व कुंडी धबधबे, हरीग्राम व शांतीवन नदीपात्र, धोदाणी, चिंध्रण, महोदर, माची प्रबख परिसर यांसह खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदई, नेवाळी धबधबा व गाढी नदीपात्र या सर्व ठिकाणी पर्यटकांना पावसाळ्यात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.


वाढत्या दुर्घटना आणि मद्यप्राशनामुळे धोका

दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. अनेकदा मद्यधुंद अवस्थेत लोक धरणाच्या पाण्यात उतरतात. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अचानक वाढलेल्या प्रवाहात अनेक पर्यटक वाहून जाऊन मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे यावर्षी विशेष दक्षता घेत ही बंदी लागू करण्यात आली आहे.


पोलीस विभागाचे आवाहन

पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) रश्मी नांदेडकर यांनी सांगितले की : “पर्यटकांनी वर्षा सहलीसाठी प्रतिबंधित केलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. उभारण्यात आलेल्या सूचनाफलकांचे पालन करून आपल्या जीवितास संरक्षण द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button