म्हातोबा टेकडीवरील झाडे जगविण्यात यश
मराठी सारांश
म्हातोबा टेकडीवरील झाडांना जानेवारी महिन्यात आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, वनविभाग व स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे झाडे पुन्हा जगविण्यात यश मिळाले आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या यशावर आनंद व्यक्त केला आहे.
English Summary
In January, trees on Mhatoba Tekdi were set on fire in an attempt to destroy them. However, due to the efforts of the forest department and local residents, the trees have been revived. Minister Chandrakant Patil expressed his happiness over this success.
वृक्ष संवर्धनासाठी विशेष प्रयत्न
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १० जून २०२४ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. त्याअंतर्गत कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी व पर्यावरणपूरक झाडे लावण्यात आली. त्यांची योग्य प्रकारे वाढ व्हावी म्हणून पाणीपुरवठा, खते, आणि सात जणांची देखरेख व्यवस्था केली होती.
झाडांवर हल्ला आणि पुनरुज्जीवनाचा प्रयत्न
जानेवारी महिन्यात काही अज्ञात व्यक्तींनी आग लावून टेकडीवरील झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या आगीत २५०० झाडांना मोठा फटका बसला. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करून वन विभागास आवश्यक कारवाईचे निर्देश दिले. झाडांना पुन्हा जगवण्यासाठी आठ जणांच्या विशेष टीमची नेमणूक करून तज्ज्ञांच्या मदतीने पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले.
अथक प्रयत्नांनंतर झाडांना नवी पालवी
वन विभाग, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवक यांच्या प्रयत्नांमुळे आगीत जळालेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटली आहे. या यशस्वी प्रयत्नांबद्दल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी समाधान व्यक्त केले असून, वृक्ष संवर्धन हेच पर्यावरण संरक्षणाचे खरे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.