रायगड

कर्जत येथे मानवी मृतदेहाचे अवशेष सापडल्याने खळबळ

मराठी सारांश

कर्जत तालुक्यातील वेणगाव परिसरात मानवी शरीराचे अवशेष सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह पुरुषाचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक तपासासाठी अवशेष मुंबई प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अधिक चौकशी सुरू आहे.

English Summary

Human body remains were discovered in the Venegaon area of Karjat, creating panic in the region. Police suspect the body belongs to a male and estimate the death occurred about a month ago. The remains have been sent for forensic examination in Mumbai, and further investigation is ongoing.


वेणगाव येथे मानवी अवशेष आढळले

कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील पराडा नावाच्या निर्जन स्थळी मानवी मृतदेहाचे अवशेष आढळल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या माहितीवरून कर्जत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, शरीराचे कुजलेले तुकडे परिसरात विखुरलेले दिसून आले.

मृतदेह पुरुषाचा असण्याची शक्यता

शरीरावर आढळलेल्या कपड्यांवरून मृतदेह पुरुषाचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, या व्यक्तीचा मृत्यू महिनाभरापूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, व्यक्तीची ओळख पटवणे आणि घातपाताचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

हत्या की पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?

या प्रकरणात कोणतीही व्यक्ती बेपत्ता नसल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे, त्यामुळे हत्या करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने येथे फेकण्यात आला असावा का? याचा तपास सुरू आहे.

फॉरेन्सिक तपासासाठी मृतदेह पाठवला

घटनास्थळी आढळलेले अवशेष फॉरेन्सिक तपासासाठी मुंबई प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, कर्जत पोलीस अधिक तपास करत आहेत.

कर्जतचा दुर्गम भाग गुन्हेगारीसाठी वापरला जातो?

गेल्या काही वर्षांत कर्जतमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. नवी मुंबईला लागून असल्याने कर्जत हे पर्यटन स्थळ आणि दुर्गम आदिवासी भाग आहे. काही समाजकंटक नैसर्गिक संपदेचा गैरफायदा घेत गुन्हे लपविण्यासाठी या भागाचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button