जनेप प्राधिकरणाने जानेवारी 2025 मध्ये 23.21% वाढीसह 635,665 टीईयूएस कंटेनर हाताळले; आतापर्यंतची सर्वाधिक रेल्वे वाहतूक 101984 टीईयूएस जानेवारी 2025 मध्ये जनेप प्राधिकरणाने हाताळली
मराठी सारांश
भारताच्या सागरी व्यापारात उल्लेखनीय वाढ करत, जनेप प्राधिकरणाने जानेवारी 2025 मध्ये 635,665 टीईयूएस कंटेनर हाताळले. यामध्ये 23.21% वाढ झाली असून, रेल्वे वाहतूकही विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
English Summary
JNPA handled 635,665 TEUs in January 2025, marking a 23.21% increase from the previous year. Rail transport also reached a record high, reinforcing its role in India’s maritime trade expansion.
जनेप प्राधिकरणाची उल्लेखनीय कामगिरी
मुंबई, 4 फेब्रुवारी 2025: भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) जानेवारी 2025 मध्ये 635,665 टीईयूएस कंटेनर हाताळले, जे जानेवारी 2024 मधील वाहतुकीच्या तुलनेत 23.21% जास्त आहे. जनेप प्राधिकरणाने एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत 6,013,086 टीईयूएस कंटेनर वाहतूक हाताळली जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 14.08% जास्त आहे.
जानेवारी 2025 ची ठळक वैशिष्ट्ये
- जनेप प्राधिकरणाने जानेवारी 2025 मध्ये 635,665 टीईयूएस कंटेनर आणि 7.92 दशलक्ष टन एकूण माल हाताळला, जो जानेवारी 2024 मधील वाहतुकीच्या तुलनेत अनुक्रमे 23.21% आणि 17.77% अधिक आहे.
- जानेवारी 2025 मध्ये जनेप प्राधिकरणाने 641 कंटेनर रॅक आणि 101,984 टीईयूएस हाताळले, तर मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 542 रॅक आणि 84,752 टीईयूएस हाताळले होते.
- या आधी मार्च 2010 मधील 100,166 टीईयूएस हाताळणी हा रेल्वे वाहतुकीचा सर्वोच्च आकडा पार करत एका महिन्यात हाताळली गेलेली ही जनेप प्राधिकरणातील आतापर्यंतची सर्वाधिक रेल्वे वाहतूक आहे.
आर्थिक वर्ष 2024-2025 ची ठळक वैशिष्ट्ये
- एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत जनेप प्राधिकरणाने 6,013,086 टीईयूएस कंटेनर आणि 76.29 दशलक्ष टन एकूण मालवाहतूक केली, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे 14.08% आणि 7.99% जास्त आहे.
- एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत जनेप प्राधिकरणाने 5,630 कंटेनर रॅक आणि 891,988 टीईयूएस हाताळले, तर मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 5,338 रॅक आणि 851,153 टीईयूएस हाताळले गेले होते.
व्यापार वृद्धीतील योगदान
परिचालन कार्यक्षमता आणि व्यापार-केंद्रित सेवा वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसह, जनेप प्राधिकरण भारताच्या सागरी व्यापार वाढीस चालना देत आहे. देशाचे प्रमुख बंदर म्हणून जनेप प्राधिकरण, या क्षेत्रासाठी नवनवे मापदंड स्थापित करत, शाश्वत आणि भविष्यवेधी बंदर परिचालन सज्जता प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.