महाराष्ट्र

अवैद्य अवजड वाहतूकीमुळे दुरशेत रस्ता जीवघेणा – ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाची तयारी

दुरशेतदुरशेत

 

 

 

 

 

 

मराठी सारांश

पेण तालुक्यातील दुरशेत गाव व आसपासच्या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता अवैध अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे अत्यंत धोकादायक झाला आहे. रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.


English Summary

The road connecting Durshet village in Pen taluka and nearby tribal settlements has become dangerously unsafe due to continuous illegal heavy vehicle movement. The poor condition of the road and inaction from the authorities have forced the locals to plan an intense protest.


पेण तालुक्यात मुंबईगोवा महामार्गावरून दुरशेत गावाकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे, तो सध्या लोकांसाठी धोकादायक बनला आहे.  कारण, या रस्त्यावर दररोज 300 ते 400 अवैध आणि ओव्हरलोडेड डंपर गाड्या जात आहेत. या गाड्या आसपासच्या बेकायदेशीर दगड खाणी आणि खडी क्रशर प्लांटसाठी वापरल्या जात आहेत.

या गाड्यांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत, धूळ प्रचंड प्रमाणात उडते आणि जिथे धूळ कमी करायला पाणी मारलं जातं, तिथे चिखल तयार होतो. या रस्त्याने प्रवास करणारे विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध आणि नोकरदार लोक यांना दररोज जीव मुठीत धरून चालावं लागतं. मागील काही दिवसांत गंभीर अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत, पण सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

ग्रामस्थांनी १२ व १३ मे रोजी पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय अधिकारी यांना पत्राद्वारे तक्रार केली आहे, पण आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता दुरशेत परिसरातील लोक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button