शैक्षणिक, सेवा, निवडणूक आणि इतर विविध प्रयोजनांसाठी आवश्यक जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अद्याप पात्रता सिद्ध न झालेल्या अर्जदारांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत, कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) अलिबाग येथील समितीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेचा उद्देश अर्जदारांच्या अर्जातील त्रुटी दूर करून जात वैधता प्रमाणपत्र देणे हा आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी या शिबिराचा लाभ घेऊ शकतात.
शिबिराचे ठिकाण: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, प्लॉट नं.९, स.नं.७६/२ ब, सेंटमेरी कॅन्व्हेंट स्कूलच्या मागे, चेंढरे, अलिबाग येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्जदारांनी शिबिरात येऊन आपल्या अर्जासंबंधित त्रुटी दूर कराव्यात, असे आवाहन उपायुक्त तथा समिती सदस्य जयंत चाचरकर यांनी केले आहे.



More Stories
गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित एम.फिल. अर्हताधारकांचा प्रश्न सोडवल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार
नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पेण येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबीर