सुवर्णक्रांती पतसंस्थेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा
शिव निर्णय /टेंभुर्णी : सुवर्णक्रांती महिला बिगर शेती पतसंस्थेच्या विरोधात पॅंथर पावर सामाजिक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे, वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील सुवर्ण क्रांती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर व सुवर्ण क्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर मेन शाखा टेंभुर्णी या दोन्ही संस्था सुरू झाल्यापासून आजतागायत या संस्थेचे लेखा परीक्षण पुन्हा करावे या संस्था शासनाच्या नियमाप्रमाणे संस्था चालवत नसून मनमानी कारभार सुरू आहे. नियमबाह्य व्याज आकारणे, नियमबाह्य बोजा चढवणे, नियमबाह्य गहाणखत करणे, व जामीनदाराकडून कर्जाची वसुली करणे, जामीनदाराच्या नावे बोजा चढवणे व त्याचे गहाणखत करून घेणे व त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता बळकवणे अशा या संस्थेचा राजरोजपणे कारभार चालू असून वेणेगाव येथील ज्योतीराम कुठे यांची सोलापूर पुणे हायवे लगत असलेली 17 गुंठे जमीन बळकवण्याचा प्रयत्न सुवर्ण क्रांती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब बोराडे करत असल्याचा आरोप पॅंथर पावर सामाजिक संघटनेने केला आहे. सदर बाबत बोराडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत आहे.