सामाजिक उपक्रम

इरा पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सुहाना सफर रेट्रो थीम उत्साहात संपन्न

टेंभुर्णी : इरा पब्लिक स्कूलचे बारावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहा मध्ये संपन्न झाले. यामध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी भाग घेत रेट्रो थीम हा कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा ठरला. रेट्रो थीम मध्ये जुनी पुराणी गीताने बहारलेला कार्यक्रम असल्याने पालक माता पालक व प्रेक्षकांनी शाळेचे मैदान तुडुंब भरून गेले होते अतिशय सुंदर झालेल्या या स्नेहसंमेलनाची सुरुवात राम गीताने झाल्याने प्रेक्षकांनी या गीताला टाळ्याच्या गजरामध्ये दाद दिली. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ थोरात, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना संचालक हिम्मत भाऊ सोलंकर, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा ओबीसी जिल्हा अध्यक्ष गजानन वाकसे, मार्केट कमिटीचे संचालक आप्पासाहेब पाटील, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष भाऊसाहेब महाडिक , महात्मा फुले विद्यालयाचे संस्थापक नारायण भानवसे, टिंकल स्टार चे संस्थापक हरिश्चंद्र गाडेकर,ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे, बाळासाहेब ढगे, अमोल धोत्रे, विजयकुमार कोठारी, विलास देशमुख, अँड मंगेश देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख, बलभीम लोंढे, शिराज भाई तांबोळी, संतोष नाळे, घळके बापू, डॉ शेंडगे, किशोर सलगर, रोहित आरडे ,आडेगावचे रुपनवर, वरकुटे सापडण्याचे माजी सरपंच बी के गायकवाड, संदीप बंडगर, इरा पब्लिक स्कूलचे संस्थापक महेंद्र वाकसे,संस्थेच्या सचिव जयश्री वाकसे, संस्थेचे सर्व पालक विद्यार्थी टेंभुर्णी तील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आशीर्वाद दिले. काल पहिल्या दिवशीचा कार्यक्रम अतिशय बहारदार झाला असून या कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन संस्थेचे सहशिक्षक लक्ष्मण नलवडे, व शिक्षिका सुषमा वजाळे यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेतील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडला.
स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आवर्जून उपस्थित असलेले पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांचा सन्मान या संस्थेचे संस्थापक महेंद्र वाकसे, संस्थेच्या प्रिन्सिपल जयश्री वाकसे, यांनी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ. देऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान केला यावेळी त्यांनी संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक. व प्रेक्षक यांना शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button