सोलापूर
आदर्श स्कूलचा कुस्तीमध्ये दबदबा- नयन उबाळे तालुक्यात प्रथम

कुर्डुवाडी : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र जिल्हा क्रीडा विभाग सोलापूर आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटात आदर्श पब्लिक स्कूल कुर्डूवाडीची विद्यार्थ्यीनी नयन उबाळे हीने +60 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. क्रीडा प्रकारामध्ये आदर्श पब्लिक स्कुल चे वर्चस्व कायम पाहायला मिळत आहे.
नयन उबाळे घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अमोल सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब उबाळे व संस्थेच्या प्रकल्प संचालिका मा.पूजा सुरवसे यांनी अभिनंदन केले व पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या