महाराष्ट्रराजकारण
रांजणी भिमानगरच्या सरपंच सौ.चंचला पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिला राजीनामा

टेंभुर्णी : रांजणी भिमानगर येथील सरपंच सौ चंचला विजयराव पाटील यांनी आज आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दिले. जरांगे पाटील यांना समर्थन दिलेल्या जिल्ह्यातील पहिल्या सरपंच म्हणून आज त्यांच्याकडे जनता कुतूहलाने पहात आहे. त्यांची रांजणी भिमानगर या ग्रामपंचायतीमध्ये गेली चार ते पाच महिन्यांमध्ये सरपंच पदी नियुक्ती झाली असताना त्यांना सत्तेचा कधीच हव्यास वाटला नाही व वाटणार ही नाही.
मी पदापेक्षा माझ्या मराठा समाजावर जास्त प्रेम करीत असल्यामुळे मी क्षणाचाही विलंब न लावता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा जाहीर केला.
यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की आम्हाला मराठा आरक्षणापेक्षा कुठलेही पद महत्त्वाचे नसून मी आज सरपंच पदाचा राजीनामा घोषित करत असून जोपर्यंत सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार आहे. आम्ही उद्यापासून आमरण उपोषण करणार आहोत. मराठा योद्धा जरांगे पाटील हे अन्न पाण्याविना गेली चार ते पाच दिवस उपोषणास बसले असताना याच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रातील सरकार कुठलीही दखल घेत नसल्यामुळे व आरक्षण देण्यास विलंब करीत असल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने मी माझा निर्णय घोषित करीत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन व केंद्रातील सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.