रायगड

बोहरा समाजाच्या दफन भूमीत बेवारस मृतदेह दफन करण्याचा प्रकार; प्रशासनास निवेदन

बेवारस मृतदेह

मराठी सारांश

बोहरा समाजाच्या दफन भूमीत परस्पर बेवारस मृतदेह दफन केल्याच्या घटनांबाबत समाजाच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे समाजात नाराजी असून, यावर त्वरित कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

English Summary

The Bohra community has submitted a memorandum to the authorities regarding the illegal burial of unclaimed bodies in their cemetery. They have warned of a mass protest if the administration fails to take immediate action.


बोहरा समाजाच्या दफन भूमीत बेवारस मृतदेह दफन करण्याची तक्रार

बोहरा समाजाच्या अधिकृत दफन भूमीत त्रयस्थ बेवारस मृतदेह बेकायदेशीररित्या दफन केल्याच्या घटनांबाबत समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.

प्रशासनाकडे निवेदन सादर

बोहरा समाजाच्या वतीने जनाब हुसेन अमरावतीवाला साहेब, शेख हुनेद भाई, मुल्ला मूर्तझा, अलीअसगर धारीवाला, मुस्तफा धारिवाला, हुसेन जमाली, शब्बीर धारीवाला, युसुफ धारीवाला, मूफद्दल दाभिया, हुझैफा कर्जतवाला, मूर्तझा मोआय्यदी, ताहेर कर्जतवाला, इसाक, मोइझ, हुसेन कर्जतवाला, शब्बीर कर्जतवाला, मन्सूर अलीअसगर बोहरी, अलीअसगर उदयपूरवाला, मुफद्दल टिनवाला आदींनी मिळून संबंधित कार्यालयांना हे निवेदन दिले.

2001 पासून अधिकृत दफनभूमी

बोहरा समाज कर्जतमध्ये सुमारे 100 वर्षांपासून वास्तव्य करत असून, सध्या सुमारे 150 कुटुंबे येथे राहतात. पूर्वी समाजातील मृत व्यक्तींचे लोणावळा, नेरळ, खोपोली येथे दफन करावे लागत असे. त्यामुळे 2001 साली कर्जत नगरपालिकेच्या मुद्रे खुर्द येथील सर्वे नंबर 14, हिस्सा नंबर 0 मधील 31 गुंठे जागा शासनाने बोहरा समाजासाठी अधिकृत दफनभूमी म्हणून दिली.

प्रशासनाने दिले होते आश्वासन

या आधीही या ठिकाणी परस्पर बेवारस मृतदेह दफन केल्याच्या घटना घडल्या असून, 22 एप्रिल 2024 रोजी कर्जत पोलीस ठाणे व कर्जत नगरपरिषद यांच्याकडे समाजाने तक्रार दाखल केली होती. त्यावेळी प्रशासनाने असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, असे प्रकार वारंवार घडत असल्याने समाजात तीव्र नाराजी आहे.

प्रशासनाला जनआंदोलनाचा इशारा

बोहरा समाजाने प्रशासनास स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, यापुढे अशा घटना होणार नाहीत याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अन्यथा समाजाच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारले जाईल. हे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी व कर्जत पोलीस ठाणे निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button