सोलापूर जिल्ह्यात 19 डिसेंबरपासून सुशासन सप्ताह
सोलापूर, दि.19, :- देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त 25 डिसेंबर हा दिवस दरवर्षी सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत असून, जिल्ह्यात ‘प्रशासन गांव की ओर’ हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली.
केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाने https://darpgapps.nic.in/GGW24 हे पोर्टल विकसित केले असून सदर पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून “सुशासन सप्ताह” कालावधीत कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये विशेष शिबिरांमध्ये सोडवलेल्या सार्वजनिक तक्रारींची संख्या, सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागामध्ये सोडवलेल्या सार्वजनिक तक्रारींची संख्या, राज्य पोर्टलवर सोडवलेल्या सार्वजनिक तक्रारींची संख्या, ऑनलाइन सेवा वितरणासाठी जोडलेल्या सेवांची संख्या, निकाली काढलेल्या सेवा वितरण अर्जांची संख्या, शासन पद्धतींचे संकलन आणि प्रसार आणि ते आवश्यक चित्र पोर्टलसह सामायिक करणे, सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी यशोगाथा, प्रसार कार्यशाळेचे तपशील याचा समावेश राहणार आहे.
तसेच दि. 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे मुख अतिथी म्हणून संबंधित जिल्हयांमध्ये जिल्हाधिकारी या पदावर काम केलेले भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या सप्ताहात प्रशासनाच्या नवनवीन संकल्पना व उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारींचे निवारण तसेच ऑनलाईन सेवा व सेवा वितरण अर्जाचा निफटारा करण्यात येणार आहे