महाराष्ट्रराजकारण
सोलापूर महानगर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांचा सत्कार.

सोलापूर : 42 लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे विजयी झालेले नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महानगर च्या वतीने उपनेते सौ.अस्मिता गायकवाड, महानगरप्रमुख विष्णू कारमपुरी, दक्षिण शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन वाजत गाजत सत्कार करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी उत्तर शहर प्रमुख महेश धाराशिवकर ,उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर , उपशहर प्रमुख रेवन बुक्कानुरे , उपशहर प्रमुख शिवा ढोकळे, उपशहर प्रमुख संदीप बेळमकर , उपशहर प्रमुख विवेकानंद कंदकुरे , उपशहर प्रमुख अमित भोसले, उपशहर प्रमुख सैदाप्पा जांगडेकर , युवती सेना शहर संघटिका रेखा आडकी , विडी कामगार सेनेचे तुळशीबाई चिलवेरी , महिला आघाडी रमा सरवदे , संतोषी भोळे, विभाग प्रमुख प्रशांत जक्का, कामगार सेनेचे विठ्ठल कुराडकर , रमेश चिलवेरी, पप्पू शेख , गुरुनाथ कोळी , श्रीनिवास बोगा , नागार्जुन कुसुरकर,यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित .