सोलापूर

43 माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकुर यांचे मतदान जनजागृती व मतदान केंद्राविषयी आकाशवाणीवरून प्रसारित झालेली  मुलाखत

प्रश्न क्र 1.  43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी कशाप्रकारे सुरू आहे.

उत्तर-  43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस आणि सांगोला असे चार मतदार संघ आणि माण व फलटण असे साताऱ्याचे दोन मतदारसंघाचा समावेश होतो. एकूण 2030 मतदान केंद्रे आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून मतदान केंद्रावर जाण्यासाठी यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. विविध पथकांच्या माध्यमातून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले आहे.

  1. लोकशाहीत मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची आहे याबद्दल काय सांग

=== लोकशाहीत मतदारांची भूमिका महत्त्वाचे आहे. यासाठी पूर्ण पाच वर्ष आपण तयारी करतो. मतदार दुरुस्तीचे कार्यक्रम आपण घेतो. विविध उपक्रमाच्या माध्यमातून कॉलेजमध्ये नव मतदार युवकांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करून घेण्यात आले. मोठ्या प्रमाणात नव मतदारांनी मतदान करावी हीच आमची अपेक्षा आहे.

प्रश्न:  किती विभाग आहेत आणि त्यांच्यासोबत कशाप्रकारे समन्वये साधता येते.

जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते.

 प्रश्न: मतदान जनजागृती विषयी काही विशेष उपक्रम राबवले आहेत का

उत्तर: आपण सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली आहे. त्यासोबत विशेष फिरते चित्ररथाच्या माध्यमातून लोकांमध्ये ईव्हीएम मशीन बद्दल जनजागृती देखील करण्यात आली आहे.

  1. वंचित, तृतीयपंथीय, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या मतदानासाठी काही विशेष उपक्रम राबवले आहे का?

उत्तर :  जे   दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक घरातून येऊ शकत नव्हते अशांसाठी आम्ही आमचे बि.एल.ओ मार्फत त्यांना घरी जाऊन त्यांचे त्यांना हे आम्ही विचारलं होतं आणि त्यांचे मागणी नोंदवले होते की त्यांना होम वोटिंग करायचं आहे तर अशांना जे याच्यामध्ये पीडब्ल्यूडी म्हणजे दिव्यांग यांचा समावेश आहे याच्यामध्ये पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकली सर्व मतदारांना ज्यांना मतदान केंद्र पर्यंत येणे शक्य नाही अशांसाठी ही व्यवस्था केली होती. तर होम वोटिंग मध्ये सुद्धा आम्ही आमच्या जवळपास 2200 मतदारांचा वोटिंग करून घेतलेला आहे तर त्यामुळे त्यांचं अगोदरच मतदान झालेले याच्यामध्ये काय काय आमचे मतदार 106, 103 वर्षाचे असे सुद्धा आहेत तर त्यांचे आमच्याकडे माहिती आली त्यातून हे कळलं तर हे सुद्धा सुविधा आयोगाने त्यांच्यासाठी उपलब्धकरून दिली आहे.

  1. सोलापुरात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच आपलं मतदान येत आहे तर यासाठी काही वेगळ्या उपाययोजना आपल्याकडून करण्यात आलेले आहेत का?

 = खूप चांगला प्रश्न आहे आणि मला हे सांगायचं आहे विशेष करून सर्व आम्ही मतदान केंद्रा वरती आपल्याला वाटते की तो ऊन आहे उन्हात उभा राहू लागेल आणि कशाला मग आपण जायचं तर तसं न करता जप तक खुर्च्या त्याच्यानंतर तिथे पाण्याची उपलब्धता जर आवश्यक असल्यास आपल्याला ओ.आर.एस सुद्धा पाणी तिथे आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना रांगेत उभा राहण्यची सुद्धा आवश्यकता नसते सगळ्यांना माहित आहे तर ते त्यांना रांगेत उभारण्याचे आवश्यकता नाहीये ते जाऊन मतदान करू शकतात मतदान केंद्रा वरती हिरकणी कक्ष आहे. त्याठिकाणी महिलां सोबत असलेले लहान मुलांसाठी सुद्धा व्यवस्था आहे वेटिंग रूम शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या खोल्या आहेत त्याच्यातले खोली असे त्यांना शक्य तेवढे जे आपल्याला मतदान केंद्राची मदत आपण तिथे व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकतो ते आपण करून देणार आहोत.

  1. मतदानाची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे.

उत्तर: सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात जर कोणी मतदार सहा वाजता रांगेत उभा असेल तर त्याचं मतदान होईपर्यंत ते मतदान केंद्र सुरू असेल.

7 निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वयंसेवकाचे काही मदत घेता येते का?

उत्तर:  प्रत्येक मतदान केंद्रावरील स्वयंसेवक तेथे आलेल्या मतदारांना मतदान केंद्रावर येणाऱ्या अडचणी बद्दल मदत करणार आहेत तसेच ज्या मतदारांचे मतदार यादी मध्ये नाव सापडत नसेल त्या ठिकाणी उपस्थित असलेले बी.एल. ओ. आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून मतदारांचे नाव शोधून देऊन त्यांना बूथपर्यंत पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

8 आपल्याकडे किती बूथ आहेत आणि मतदारांना बूथ पर्यंत पोहोचवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेले आहेत का?

= 43 माढा मतदार संघा मध्ये 2030 मतदान केंद्र आहेत आणि बूथ हे जवळ जवळ असल्याने त्याच्यासाठी आपण वेगळ्याने काही व्यवस्था केलेले नाही तथापि जे दिव्यांग मतदार आहेत त्यांनी जर Saksham App वर  मागणी केलेली असेल तर त्यांना आणण्या साठीची वाहन व्यवस्था त्यात आपल्याला करता येते.

9  मतदानाच्या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी किंवा अशी काही योजना

उत्तर: मतदानाच्या ठिकाणी सर्व आवश्यक वैद्यकीय सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे. आशा सेविका वैद्यकीय आरोग्य पथक आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून मतदारांसाठी आरोग्य सेवेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण सर्व मतदारांनी 7 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावा आणि या निवडणूक उत्सवांमध्ये अभिमानाने सहभागी व्हावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button