January 25, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात

सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात

 

कोंडी : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा कारला पुणे महामार्गावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जगताप यांना काहीही झालेले नाही.

पुणे उपसंचालक कार्यालयात सुनावणी असल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे मंगळवारी सकाळी पुण्याकडे निघाले होते. मोहोळ जवळ गेल्यावर त्यांच्या गाडीमध्ये दोष निर्माण झाला. त्यामुळे दुसरी कार मागून ते पुण्याकडे रवाना झाले. शेटफळ जवळ उसाच्या ट्रॉलीला कारची मागून धडक बसली. या धडकेत कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने शिक्षणाधिकारी जगताप व चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे एअर बॅग उघडल्या व कोणासही इजा झाली नाही. पण धडक बसल्यानंतर बोनेटवर आदळल्यामुळे शिक्षणाधिकारी जगताप यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सुदैवाने याबद्दल कोणालाही इजा झाली नाही. या अपघातामुळे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सुनावणी लांबणीवर टाकली आहे.