सामाजिक उपक्रम

सोलापुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांचा सन्मान

शिव निर्णय / सोलापूर,  :  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा”राज्यस्तरीय शुभारंभ शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. याचे थेट प्रक्षेपण हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या योजनेचा लाभ मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांना तसेच या योजनेचे अर्ज भरणारे ऑपरेटर यांना प्रतिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, विधानसभा क्षेत्र निहाय स्थापन केलेल्या समित्यांचे अध्यक्ष व सदस्य तसेच सोलापूर जिल्ह्यातील सातशे ते आठशे महिला लाभार्थी उपस्थित होत्या.
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ग्रामीण पातळीपर्यंत प्रचार प्रसिद्धी करून ही योजना प्रशासनाने प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवली यामुळे जिल्ह्यात आज रोजी पर्यंत सहा लाख 14 हजार 700 अर्ज प्राप्त झालेले असून विधानसभा क्षेत्र निहाय समित्यांनी त्यातील 5 लाख 94 हजार 587 अर्ज मंजूर केलेले आहेत. दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून या योजनेत अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
तालुका निहाय अर्ज मंजूर झालेली संख्या पुढीलप्रमाणे. अक्कलकोट 45 हजार 148, बार्शी 55 हजार 421, करमाळा 33 हजार 635, माढा 43 हजार 247, माळशिरस 66 हजार 254, मंगळवेढा 34 हजार 258, मोहोळ 39 हजार 848, उत्तर सोलापूर 1लाख 6 हजार 581, पंढरपूर 64 हजार 780, सांगोला 42 हजार 930 व दक्षिण सोलापूर 62 हजार 485.

लाभार्थी कोट-
1.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट रोजी माझ्या बँक खात्यावर 3000 रू जमा झाले. याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब व शासनाची खूप खूप आभारी आहे. माझ्यासारख्या लाखो बहिणीच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची आहे. बँक खात्यावर पैसे जमा झाल्याने खूप खूप समाधान आहे. ही योजना अशीच निरंतर सुरू राहावी.
– सौ.भाग्यश्री कोळी, सोलापूर

 

2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिनांक 4 जुलै 2024 रोजी नारीशक्ती दूत ॲपवर ऑनलाईन अर्ज भरला होता. मुख्यमंत्री महोदय दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील असे वारंवार सांगत होते. त्यांचे म्हणणे खरे ठरले व 15 ऑगस्ट रोजी माझ्या खात्यावर दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले. त्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे ही योजना अशीच निरंतर सुरू ठेवावी यातून माझ्या कुटुंबाचा खर्च भागवण्यास मला मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदय व राज्य शासनाचे मी व माझ्यासारखे अनेक बहिणी आभार व्यक्त करत आहेत.
— सौ. अंजली बसवराज बेंचे, सोलापूर

*योजनेअंतर्गत आज अखेरपर्यंत प्रशासनाने केलेली कार्यवाही-
1.सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे योजनेबाबत (अर्ज स्विकृती, ऑनलाईन अर्ज भरणे, छाननी बाबत प्रशिक्षण घेतले)2. सर्व अंगणवाडी केंद्रांवर, ग्रामपंचायत कार्यालयासत योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले. 3. पालखी मार्गावर / वारी मार्गावर हिरकणी कक्षाच्या माध्यमातून योजनेचे मोठे बॅनर लावून प्रचार व प्रसिध्दी केली. 4. ग्रामपंचायत स्तरावर अर्ज भरणे आधार कार्ड अपडेट करणे बँक खाते उघडणे याबाबत शिबीरांचे आयोजन केले. 5. मंडल स्तरावर उत्पन्न दाखला रेशन कार्ड अपडेट करणे याबाबत शिबीरांचे आयोजन६. आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र यांचे ऑनलाईन अर्ज भरणेबाबत प्रशिक्षण घेतले. 7. जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत योजनेबाबत सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकासअधिकारी यांची नियमित आढावा सभा घेवून योजनेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करणेत आले. 8. शासनामार्फत प्राप्त झालेले प्रचार, प्रसिध्दी साहित्य जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, ग्रामपंचायत यांमध्ये 48 तासांच्या आत लावणेबाबत सूचना दिलेल्या आहेत व त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. 9. दिनांक 20 जुलै 2024 रोजी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच अपूर्ण प्राप्त अर्ज त्रुटी पूर्तता तसेच 100% लाभार्थी यांचे अर्ज भरून घेण्याच्या उददेश्याने महिलांच्या विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. 10. अर्ज स्विकारणेसोबतच आधार सिडींग असलेची खातरजमा करणेची कार्यवाही आपले सरकार कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांचेमार्फत सुरु आहे. 11. ग्रामस्तरीय समिती स्थापन करणेबाबत सूचना दिल्या असून दर शनिवारी पात्र लाभार्थ्याच्या यादीचे चावडीवर वाचन करण्यात येत आहे व अपूर्ण कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हाभरातून या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला व 6 लाख 14 हजार 700 अर्ज प्राप्त झाले असून पैकी 5 लाख 94 हजार 587 अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा त्यांच्या बँक खात्यावर थेट पंधराशे रुपये जमा होणार आहेत या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून थेट दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button