सोलापूर

सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे पहारेकरी या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर दि. 14:- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर पहारेकरी- 01 पद भरावयाचे आहे. पहारेकरी पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. मानधन रूपये 20886/- प्रतिमहा असेल. तसेच सदरील पद हे निवासी आहे. पहारेकरी पद हे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाची असून सोलापूर जिल्हयातील माजी सैनिक यांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी प्रत्यक्ष या कार्यालयात सादर करावे व या पदाकरिता त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येतील. तरी उमेदवारांनी स्वत:ची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत. या पद निवडीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल. तरी सोलापूर जिल्हयातील पात्र व गरजू माजी सैनिकांनी अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button