सोलापूर

सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम, सन 2024-25 साठी 1 कोटी 72 लाखाचे उद्दिष्ट -उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर

सोलापूरदि. 19 : – देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकुल अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहीद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजदिन निधीचा विनियोग केला जात असल्याने संकलनात सर्वांनी योगदान करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर यांनी केले.

                सशस्त्र सेना ध्वजदिन निधी -२०२४ संकलन शुभारंभ व ध्वजदिन -२०२३ चे उत्कृष्ट निधी संकलन

केलेल्या कार्यालय प्रमुखांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम बहुउद्देशीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,

सोलापूर येथे संपन्न झाला.  यावेळी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर, कमांडर अशोक कुमार (नि), मा.श्री. कादर शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक, अविनाश घाटगे,राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, अरुणकुमार तळीखेडे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष, सोलापूर, जिल्हयातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख, विविध संस्था व शाळा, महाविदयालयाचे ३८ बटालियन चे एन.सी.सी कॅडेट, वीरमाता, वीरपिता, वीरनारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

                उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यावेळी म्हणाले, माजी सैनिक, शहीद जवान यांचे प्रतिनिधी यांनी मागणी केल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडील विषय मार्गी लावण्यात येतील.  तसेच शासनाने सोलापूर जिल्ह्यास सन 2024 साठी ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

                प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले व शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

                मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी ध्वजदिनाचे महत्व तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनाविषयी उपस्थितांना माहिती दिली.                            शासनाने सोलापूर जिल्ह्यास सन 2023 या वर्षीसाठी रु. ०१ कोटी ५४ लाख ४१ हजार फक्त सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले होते.    जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ठ रु १,५९,२०,११५/- म्हणजेच १०३.१०% उद्दिष्टपुर्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलदीप कमळे , सहा.शिक्षक,  सिध्देश्वर इंग्लिश मेडीयम हायस्कूल, सोलापूर यांनी केले.

                कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. तसेच या कार्यक्रमास श्री सिध्देश्वर इंग्लिश मेडियम हायस्कूल, सोलापूर येथील विदयार्थ्यांनी व शिक्षीकांनी देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम करुन कार्यक्रमाची शोभा वाढविली. सर्वात शेवटी सृती कुलकर्णी, सहा.शिक्षक श्री सिध्देश्वर इंग्लिश मेडीयम हायस्कूल, सोलापूर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button