महाराष्ट्र
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा : टेंभुर्णीतील कॅण्डल मोर्चाद्वारे नागरिकांची मागणी

टेंभुर्णी : टेंभुर्णी येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅण्डल मोर्चाचे दिनांक 7/3/ 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजता कॅण्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते छत्रपती संभाजी महाराज अकलूज चौक येथे या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चादरम्यान टेंभुर्णी व परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज अकलूज चौक येथे या मोर्चाची सांगता करते वेळी आपले विचार व्यक्त करताना रावसाहेब देशमुख, प्रमोद कुठे, मधुकर देशमुख, औदुंबर देशमुख, परमेश्वर खरात, सोमनाथ कदम, अमोल जगदाळे, दत्तात्रेय ढवळे, सारंग गायकवाड, सुरेश लोंढे, जयवंत पोळ, अँड तुकाराम राऊत यांच्यासह अनेक मान्यवरानी आपले परखड विचार व्यक्त करताना म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा योग्य आहे व यामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी यावेळी एकच मागणी करण्यात आली.
यावेळी गोरख देशमुख, गणेश केचे, विलास देशमुख, नागेश खटके, पपेश पाटील, शिकंदर आतार, प्रशांत देशमुख, बिबीशन कांबळे, महेंद्र सोनवणे, विशाल गायकवाड, विठ्ठल मस्के,आप्पा हवलदार बिट्टू केचे, आजिज शेख, समीर नाईक नवरे, अशीप रास्तापुरे, रब्बूभाई शेख, राजू तांबोळी, रियाज तांबोळी, प्रशांत सोनवणे सोमनाथ खरसांडे, मंगेश इंदलकर, शशिकांत नांगरे, नवनाथ जाधव यांच्यासह टेंभुर्णी व परिसरातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन कॅण्डल मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाची सांगता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास सौ राधाताई देशमुख, व सौ शीला सटाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सांगता करण्यात आली