March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

सरकारने मराठा समाजाचा अंत  पाहू नये, आरक्षण त्वरित द्यावे. विजय साळुंखे 

सरकारने मराठा समाजाचा अंत  पाहू नये, आरक्षण त्वरित द्यावे. विजय साळुंखे 
बार्शी  : एक दिवस अन्न पाणी त्याग करून बार्शी शहर व तालुका काँग्रेसने मराठाआरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बार्शी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर विजय साळुंखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये मराठा समाजाला त्वरित ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे. जर मराठा समाजाचा संयम सुटला तर राज्य सरकारला मराठा समाजाला आवरणे कठीण जाईल असा इशारा देत हे अनाधिकृत सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास असमर्थ ठरत आहे बार्शी  तालुक्यातील व राज्यातील मराठा युवकांनी आत्महत्या न करता या सरकारशी लढत आरक्षण मिळवायला हवे आपला वारसा हा आत्महत्या करण्याचा नसून आपला वारसा हा शिवरायांनी दिलेला लढण्याचा आहे त्यामुळे मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या करू नये असे कळकळीचे आवाहन यावेळी डॉक्टर विजय साळुंखे यांनी केले.   बार्शी शहर व तालुका काँग्रेस तसेच राज्य काँग्रेस संपूर्ण मराठा समाजाच्या व मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी तसेच मराठा आरक्षण मिळण्यासाठी बार्शी शहरातील मराठा युवा नेते आनंद काशीद समर्थ तुपे अनिल चौधरीव इतर  मराठा आंदोलकांनी गेले चार दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्या उपोषणास पाठिंबा देण्याकरिता युवक काँग्रेस बार्शी तालुका काँग्रेस शहर काँग्रेस काँग्रेस अल्पसंख्याक विभाग या सर्व विभागाच्या वतीने डॉक्टर विजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाचकुडवे युवक तालुका अध्यक्ष निखिल मस्के व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवस अन्न पाणी करून मराठा आरक्षणास पाठिंबा जाहीर केला यावेळी उपोषण कर्ते त्यांच्यासह कृष्णराज बारबोले विजय कोरे पत्रकार गणेश गोडसे यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.