March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

समपहरण केलेल्या मालमत्तेचा तहसिल कार्यालय, खालापूर येथे दि.23 डिसेंबर रोजी जाहीर लिलाव

रायगड दि.10 :- मे.इझिनॉक्स स्टिल्स लि. तर्फे डायरेक्टर सुधीर गुप्ता, रा. आनंदवाडी-सावरोली, ता. खालापूर, यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी, विनिर्दिष्टी केलेल्या मालमत्तेचे समपहरण करण्यात आले असू विक्रीसाठी यामध्ये निश्चित केलेल्या दिवसापूर्वी तलाठी सजा सावरोली यांना, देय रक्कम दिली नसेल तर, उक्त मालमत्ता, तिच्यावर बसविण्यात आलेल्या सर्व भारापासून व तिच्या संबंधात करण्यात आलेली सर्व अनुदाने व संविदा यांपासून मुक्त, अशी मालमत्ता तहसिल कार्यालय, खालापूर येथे दि.23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता, किंवा वाजण्याच्या सुमारास, जाहीर लिलावाव्दारे विकण्यात येणार  आहे, असे तहसिलदार खालापूर अभय चव्हाण यांनी कळविले आहे.

गाव आनंदवाडी भू- मापन क्रमांक व पोट-विभाग सं. नंबर क्रमांक5/1, क्षेत्र (चौमी) 4 हजार 700, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार संबंधीत क्षेत्रासाठी हातची किंमत 1 कोटी 18 लाख 64 हजार 200,  उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार क्षेत्र रु.3810 चौमी साठी हातची किंमत1 कोटी 18 लाख 64 हजार 200,  देय असलेल्या जमीन महसूलीची थकबाकी 1 कोटी 02 लाख 22 हजार 760.