सामाजिक उपक्रम

श्री विठ्ठल कारखान्यावर कर्मवीर औदुंबरआण्णांची १०० वी जयंती साजरी

वेणुनगर : – पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना
येथे संस्थापक चेअरमन व माजी आमदार कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांची १०० वी जयंती
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे पुर्णाकृती
पुतळ्याची विधीपुर्वक पुजा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूरचे माजी प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे
माजी सचिव डॉ. जे.जी. जाधवसर, कारखान्याचे जेष्ठ सभासद श्री मधुकर नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी
उपसभापती श्री बाळासाहेब पाटील, श्री विठ्ठल हॉस्पीटलचे सचिव श्री अभिजीत राजाराम पाटील यांचे
शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन  अभिजीत पाटील,  रणजित राजाराम पाटील व सर्व संचालक
मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत सपन्न झाला.
याप्रसंगी राजेंद्र पवार यांनीही आवर्जून उपस्थित राहून
कर्मवीर कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, कै. औदुंबरआण्णा पाटील व्यापारी दृष्टीकोण घेवून पंढरपूर तालुक्यात आले व त्यांना सर्वांच्या सहकायनि विधानसभेत जाणेची संधी मिळाली व कै. यशवंतराव चव्हाण व  शरदचंद्र पवार यांचे विचारातून कमी खर्चात श्री विठ्ठल कारखान्याची निर्मिती करुन पंढरपूर तालुक्यात कृषी व औद्योगिक क्रांती करुन दाखविली. कै. औदुंबरआण्णांनी
अतिशय काटकसर करुन स्वभांडवलातून कारखान्याचे विस्तारीकरण करुन सातत्याने सोलापूर जिल्ह्यात एक
नंबरचा व महाराष्ट्रात सहा नंबरचा दर देवून कारखान्यास वैभव प्राप्त करुन दिले. त्यांनी कै. आण्णांच्या जुन्या
आठवणींना उजाळा देवून म्हणाले की, आम्हीही कै. औदुंबर आण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून कारखान्याचा
कारभार करुन यापुढे सर्वांत जास्त दर देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे १०० व्या जयंतीनिमित्त कारखान्यामध्ये उत्पादानाशी
निगडीत अखंड प्रामाणिकपणे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सेवकांचा प्रातिनिधीक स्वरुपात गुणगौरव सन्मान चिन्ह
व मानधन देवून उपस्थितांच्या शुभहस्ते गौरव करणेत आला व यापुढेही कै. आण्णांच्या जयंतीच्या वेळी सर्व
विभागातील कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार म्हणून गौरव करणेत येईल, असे अभिजीत पाटील यांनी
सांगीतले.
सदर कार्यक्रमामध्ये शेतकरी संघटनेचे नेते व श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन शिंदे-पाटील,
कारखान्याचे माजी संचालक  प्रकाशआप्पा पाटील तिसंगी, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, कारखान्याचे
जेष्ठ सभासद  मधुकर नाईकनवरे,  रणजित राजाराम पाटील,  शशिकांत पाटील, प्रा.आप्पासाहेब
पाटील,  प्रविण भोसले,  औदुंबर शिंदे,  कांतीलाल गलांडे यांनी कै. औदुंबरआण्णा पाटील यांचे जुन्या
आठवणींना उजाळा देवून आपली मनोगते व्यक्त केली व कारखान्याचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
, श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य व त्यांचा स्टाफ तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कर्मवीर औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button