महाराष्ट्रसोलापूर
श्री गणेश हायवे यांच्यावतीने तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांना फळांचे वाटप

श्री गणेश हायवे यांच्यावतीने तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवी भक्तांना खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते सफरचंद फळांचे वाटप करण्यात आले. श्री गणेश हायवे एस आर पेट्रोल पंप तळे हिप्परगा तुळजापूर रोड येथे सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमे निमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या आई तुळजाभवानी देवी भक्तांना खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांच्या शुभहस्ते सफरचंद फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी मा. खा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आपल्या मनोगतात आई तुळजाभवानी चरणी सर्व देवी भक्तांना सुखी समृद्धी आरोग्य शांती लाभो अशी प्रार्थना केली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी सर्व भक्तांनी आपल्या हातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच भक्तांना काही अडचणी किंवा त्रास होत असल्यास त्यांनी बंदोबस्तातील पोलीस कर्मचारी संपर्क साधावा असे आव्हाने केले. श्री गणेश हायवे चे प्रोप्रायटर राजू हौशेट्टी यांच्या वतीने या सफरचंद फळाचे वाटपाचे नियोजन केले होते देवी भक्ताचे सेवेचे हे 18 वे वर्षे आहे तसेच सर्व मान्यवरांचा व देवी भक्तांचा स्वागत व आभार त्यांनी मानले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गौडगाव मारुती मंदिराचे पुजारी खानापुरे, बाळासाहेब वाघमारे, आनंद चंदनशिवे, राजू हत्ती, गणेश पुजारी, चंद्रकांत रमणशेट्टी, बापू शिंदे, पोलीस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश हौशेट्टी, कुमार सुरवसे, सुमित नन्नवरे, स्वप्निल वायचळे, गणेश गुदगे, समीर सय्यद, ज्ञानेश्वर शिंदे, समर्थ बंमगुंडे, ओम खराडे, देवा यादव, सत्तार मुल्ला आदीने परिश्रम घेतले तर आभार नागराज हौशेट्टी यांनी मानले.