शिव निर्णय/सोलापूर : विध्यार्थ्यांना पुढील जीवनात कोणत्या क्षेत्रामध्ये करीअर घडवावे, भावी जीवनामध्ये उदरनिर्वाहसाठी काय करावे त्याचाच भाग म्हणून श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर मार्फत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना डॉक्टर श्रद्धा तिवारी मॅडम यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण कोणती भूमिका घेतली पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये करीअर केल्यानंतर आपले आयुष्य सुखकारक होईल, पुढील आयुष्य जगताना काय करावे लागेल, आपल्या जीवनामध्ये करीअर का महत्वाचे आहे.
सदर करिअर विषय मार्गदर्शन करताना मॅडमने आपल्या पीपीटी द्वारे जीवनातील करिअरच्या वाटा कोणकोणत्या आहेत? करिअर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशाप्रकारे करता येते? अशा विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन मॅडमनी करियर विषय मार्गदर्शन करताना केले. करिअर विषय मार्गदर्शन झाल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांद्वारे कृती करून करियर कसे निवडता येते. निवडला करिअरमध्ये कशाप्रकारे आपल्याला आनंद जीवन घालवता येते. अशा विविध पद्धतीचे प्रत्यक्ष दिग्दर्शनद्वारे विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करण्यात आले
याविषयी विद्यार्थ्यांची प्रतिसाद घेण्यात आले
या करिअर मार्गदर्शनासाठी प्राचार्य श्री. डी. डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. हे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी प्रा. रोहित होटकर, प्रा. अमोल घनाते, प्रा स्वप्निल माने, प्रा अतुल बुनगे, प्रा पुंडलिक झिरवळ, प्रा वैशाली पवार, प्रा कावेरी खजूरकर,प्रा राणी राऊत आदींनी परिश्रम घेतले. आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विपिन ठोकळ, उपाध्यक्ष श्री सचिन ठोकळ, संस्थेचे सचिव श्री भिकाजी गाजरे, संचालिका सौ शिल्पा ठोकळ यांनी शाळेचे कौतुक केले.




More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम
विशेष लेख : राष्ट्रनेत्याच्या जन्मदिनापासून राष्ट्रपित्याच्या जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’