सोलापूर, दि. 27 :- जिल्ह्यातल सर्व शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांकरीता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूर व श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत किर्लोस्कर सभागृह, श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, मुरारजी पेठ, सोलापूर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत ई ग्रंथालय आज्ञावली, आर.आर.एल.एफ कोलकत्ता यांचे कडील प्रस्तावांची माहिती, शासकीय, उत्कृष्ट ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्काराची माहिती, अभिलेख व्यवस्थापन तसेच ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक यांच्या ग्रंथालयीन कामकाजाबाबत शंका निरसन इत्यादी विषयांकरीता एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ अध्यक्ष वर्धा गजानन कोटेवार यांचे प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. तसेच या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून विविध ग्रंथालयांचे अध्यक्ष व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.



More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम