महाराष्ट्र

 शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

सोलापूर  :  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची  निवासी व भोजनाची तसेच इतर सोयी सुविधांची व्यवस्था व्हावी यासाठी समाज कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह सुरु करण्यात आली आहेत. अकलूज येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारत देण्यासाठी इच्छुक इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता चौक सोलापूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अकलूज, रूची डायनिंग हॉल, जून्या एस.टी. स्टँड पाठीमागे अकलूज येथे संपर्क साधावा  असे आवाहन गृहपाल एस .पी. थोरात यांनी केले आहे.

            सदर  इमारतीचे क्षेत्रफळ 7500 चौ. फुट पर्यंत असावे, इमारती मध्ये 20 ते 25 खोल्या, स्वतंत्र 10 शौचालये, 10 बाथरूम, स्वतंत्र वीज व्यवस्था पिण्याचे पाण्याची सोय वापरण्याच्या पाण्याची सोय, तसेच इमारती भोवती संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे. तरी अकलूज नगरपरिषद हददीतील इमारत मालकांनी 7 दिवसांच्या आत मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता चौक सोलापूर व गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अकलूज रूची डायनिंग हॉल, जून्या एस.टी. स्टँड पाठीमागे अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर संपर्क साधावा. असे आवाहनही  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाचे श्री.थोरात यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button