पुणे, : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार १० जून रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीत सभागृह क्र.१ येथे आयोजित करण्यात आली असल्याचे महसूल उप आयुक्त वर्षा लड्डा यांनी कळविले आहे.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो.




More Stories
राज्य सीईटी आता वर्षातून दोन वेळा; पीसीएम, पीसीबी आणि एमबीए अभ्यासक्रमांसाठी मोठा निर्णय
उबाठा व काँग्रेसमधील दुराव्यामुळे सोलापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला बसणार खीळ
राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद