सोलापूर : ग्रंथ व पुस्तके हे माणसे घडविण्याचे काम करतात. सर्वानी ग्रंथ अथवा पुस्तके सातत्याने वाचली पाहिजेत. वाचनाने माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होत असतात. असे जिल्हा माहिती सुनिल सोनटक्के यांनी सांगितले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी श्री सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे प्रमोद पाटील, प्रदीप गाडे तसेच असंख्य वाचक वर्ग उपस्थित होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के म्हणाले, वाचन माणसाला समृद्ध करतेच शिवाय काय चांगले काय वाईट याची समजही वाचनातून प्राप्त होत असते. संवेदनशीलता आणि आत्मविश्वास देखील वाचनातून प्राप्त होतो. कोणत्याही व्यक्तीला यश प्राप्तीसाठी पुस्तकांचा फार मोठा फायदा होतो. ग्रंथ प्रदर्शनामुळे वाचकांना नवीन ग्रंथ, पुस्तके पहावयास मिळतात. त्यातुनच वाचनाची आवड निर्माण होते. त्याचबरोबर वाचक वर्ग वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी