शिव निर्णय वागदरी( किशोर धुमाळ) : तुळजापूर तालुक्यातील वागदरीत बंदिस्त नाली कामाचा लोकार्पण व विविध विकास विकासात्मक कामाचा मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .
प्रारंभी पोलीस प्राधिकरणाचे मिटकर व उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी फुलाची उधळण करीत जंगी स्वागत केले . आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दीपावली सणाचे औचित्य साधून गावातील 100 गरजू महिलांना मिटकर परिवाराकडून साडी चोळी भाऊबीज भेट देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला . यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबईचे सदस्य उमाकांत मिटकर , मंत्रालयलीन मुख्य प्रशासकीय अधिकारी उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबईचे संतोषजी राऊत , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सप्निल लोखंडे , एडवोकेट शरद जाधवर, जनक पाटील आडोव्होकेट मुख्य जिल्हा सरकारी वकील धाराशिव याची प्रमुख उपस्थिती होती . उपस्थित मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला . याप्रसंगी सरपंच तेजाबाई मिटकर , उपसरपंच मीनाक्षी बिराजदार , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार, लोहारा नवनिर्वाचित सदस्य भाजपा हातुरे गुणाबाई बनसोडे, सुरेखा यादव, मुक्ताबाई बिराजदार, माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, मदन पाटील , ज्ञानराज मित्र मंडळाचे ज्ञानेश्वर पाटील, बालाजी बिराजदार प्रकाश सुरवसे शंकर धुमाळ दता पाटील नामदेव यादव आपा बिराजदार बाबुराव बिराजदार गणपत सुरवसे धरम सुरवसे चंद्रकांत वाघमारे आकुंल वाघमारे किशोर सुरवसे , भाजपा मिडिया सेल ता. प्रमुख किशोर धुमाळ प्रमोद सोमवंशी , दत्ता सुरवसे , रामसिंग परीहार ग्रामसेवक एम एम तांबोळी आमित लोंढे शिपाई ओकांर चव्हाण सरजेराव चव्हाण सह ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष पवार यांनी केले
वागदरीत विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन व साडी वाटप कार्यक्रम संपन्न




More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी