लोकसभा निवडणूक – 2024 निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा

रायगड – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 32- रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आज सामान्य निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा आणि निवडणूक पोलीस निरीक्षक श्रीमती जोयस लालरेम्मवी यांनी मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
राजस्व सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक श्री. झा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक श्रीमती जोयस लालरेम्मवी , पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, ज्योस्त्ना पडियार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदी उपस्थित होते.
श्री झा म्हणाले, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रियेत आपली जबाबदारी उत्कृष्टपणे हाताळावी. पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार सर्वांनी कार्यवाही आणि कारवाई करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी श्री झा यांनी एकूण जिल्ह्याचा आढावा, मतदान प्रक्रियेमध्ये असलेले मनुष्यबळ व्यवस्थापन,अधिकारी-कर्मचा-यां
पोलीस निरीक्षक श्रीमती जोयस यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी जिल्हा प्रशासनाने निवडणूक तयारीबाबत माहिती दिली. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. बैठकीला सर्व नोडल अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री झा आणि श्रीमती जोयस लालरेम्मवी यांनी कंट्रोल रूम आणि मीडिया सेल ला भेट देऊन तेथील कामकाजची पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला.
१)श्री अनंत गिते (अपक्ष)(1अर्ज),
२)श्री अनंत बाळोजी गिते(अपक्ष))(1अर्ज),
३)श्री. अनंत गंगाराम गिते (1+ 3 अर्ज) (शिवसेना)उद्धव बाळासाहेब ठाकरे),
४)श्री. नितीन जगन्नाथ मयेकर अपक्ष (1),
५)श्री. आस्वाद जयदास पाटील अपक्ष (1).
६)श्री. मंगेश पद्माकर कोळी (अपक्ष)(1अर्ज),
७)श्री.प्रकाश् बाळकृष्ण चव्हाण,२ अर्ज,(भारतीय जवान किसान पार्टी)
८) श्री पांडुरंग दामोदर चौले,१ अर्ज ,(अपक्ष)
९)श्री. सुनिल दत्तात्रेय तटकरे,४ अर्ज, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
१०) श्री. अनिकेत सुनील तटकरे,१ अर्ज,( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,)
११) श्री. गोपाळ यशवंतराव तंतरपाळे,4 अर्ज
(अपक्ष (3), इंडियन नॅशनल कॉग्रेस (1)
१२) विजय गोपाळ बना,१ अर्ज,अपक्ष
१3) सुनिल दत्ताराम तटकरी,१, अपक्ष
१४) श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती,१, अपक्ष
१५) अभिजित अजित कडवे, ,१,अपक्ष
१६) अजय यशवंत उपाध्ये,१,अपक्ष
१७) अस्मिता एकनाथ उंदिरे,१,अपक्ष
१८) अंजली अश्विन केळकर,१,अपक्ष
१९)नरेश गजानन पाटील ,१,अपक्ष
२०) मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी,२,बहुजन समाज पार्टी
२१) अमित श्रीपाल कवाडे,१,अपक्ष
२२) उस्मान बापू कागदी,१,अपक्ष
२३)अनिल बबन गायकवाड,२,बहुजन समाज पार्टी
२४) मिलिंद काशिनाथ कांबळे,१,बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
२५) नंदकुमार गोपाळ रघुवीर,१,लोकराज्य
२६) भुपेंद्र नारायण गवते,१,अपक्ष
२७) कुमोदिनी रविंद्र चव्हाण,१,वंचित बहुजन आघाडी
२८)घाग संजय अर्जुन,१,अपक्ष