सोलापूर

रोडगीकर मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित

 

शिव निर्णय / रोडगीकर मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानितसोलापूर : सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे माजी विद्या सचिव रेवणसिद्ध रोडगीकर यांना मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
शनिवारी, हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते माजी विद्या सचिव रेवणसिद्ध रोडगीकर यांना मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी  शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे , माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप,प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, प्रशासनाधिकारी संजय जावीर लेखाधिकारी वैभव राऊत, मुख्याध्यापक संघाचे नियंत्रित समितीचे अध्यक्ष सुभाष माने , जिल्हा अध्यक्ष तानाजी माने, सचिव बापू निळ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रोडगीकर यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
मुख्याध्यापक संघाने रोडगीकर यांचा मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्काराने केलेला सन्मान म्हणजे मुख्याध्यापक संघासाठी केलेल्या कार्याचा गौरव आहे असे गौरवोदगार शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
रोडगीकर यांचा मुख्याध्यापक संघाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान आहे .सोलापूर मुख्याध्यापक संघाचे कार्य महाराष्ट्र राज्यात आदर्शवत ठेवण्यासाठी कार्य केले आहेत. संघाच्या माध्यमातून विविध भरीव उपक्रम राबविले.राज्याच्या मुख्याध्यापक अधिवेशनात विविध विषयांवर शोध निबंध सादर करुन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण क्षेत्रात कोणते आमुलाग्र बदल अपेक्षित आहे ते मांडले.त्यांच्या कार्याची दखल राज्य मुख्याध्यापक संघाने घेऊन त्यांना उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून गौरविले.व्याख्यानाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण विचार मांडले.शासन निर्णय व परिपत्रकांचे सूक्ष्म अभ्यास असल्याने सहज मार्गदर्शन करत असतात.आज रोडगीकर यांना मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button