March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

रिक्षातून वाहतूक होणारी अठरा हजारांची फ्रुट बियर जप्त

रिक्षातून वाहतूक होणारी अठरा हजारांची फ्रुट बियर जप्त

शिव निर्णय / सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात एका मालवाहतूक रिक्षातून १८ हजार रुपये किमतीची फ्रुट बिअर वाहतूक होताना जप्त केली असून दोन आरोपींना अटक केली आहे.

सविस्तर वॄत्त असे की, सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राहुल बांगर यांचे पथकाने सोलापूर शहरातील अशोक चौक येथील वालचंद कॉलेज समोरील रोडवर सापळा लावून अल्ताफ हपिसाब सगरी, वय 32 वर्षे व गौस अलीशेर बागवान, वय 31 वर्षे, दोघेही राहणार सरवदे नगर, मुळेगाव रोड सोलापूर हे इसम मालवाहतूक रिक्षा क्र. MH 13 AN 4898 मधून युनिक ड्रिंक्स कंपनीचे फ्रुट बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या सहाशे सीलबंद बाटल्या वाहतूक करताना आढळून आले. विभागाने घटनास्थळावरून अठरा हजार रुपये किमतीच्या फ्रुट बियरसह एकूण 63 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन व्हनगुंटी व शोएब बेगमपूरे यांच्या पथकाने पार पाडली.