राष्ट्रीय लोकअदालतीचे 28 सप्टेंबरला आयोजन
सोलापूर दि.20:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर लोकन्यायालयामध्ये प्रामुख्याने सोलापूर महानगरपालिकेचे मिळकत कर तसेच भूमी व मालमत्ता विभागाची प्रकरणे ठेवण्यात आली आहे. सदर लोकन्यायालयामध्ये सोलापूर महानगरपालिकेकडून थकीत मिळकत करावरील दंड/शास्ती यामध्ये 50 टक्के पर्यंत सुट देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोईसाठी मिळकत कर, भूमी व मालमत्ता विभागाशी संबंधीत प्रकरणासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर सवलतीचा फायदा नागरीकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.