March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त सोलापूर गांधी फोरमच्या वतीने अभिवादन.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त सोलापूर गांधी फोरमच्या वतीने अभिवादन.
सोलापूर २
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त सोलापूर गांधी फोरमच्या वतीने सोलापूर शहर अध्यक्ष प्रा. राहुल बोळकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. सोलापूर शहर गांधी फोरम चे अध्यक्ष प्रा बोळकोटे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त श्रीमती शितल तेली उगले यांनी कमी वेळेत पुतळा परिसरात रंगरंगोटी करून सीसीटीव्ही कॅमेरा कर्यानवित करून दिले. याबद्दल गांधी फोरमच्या वतीने लवकरच आयुक्तांचे अभिनंदन करून आभार मानण्यात येणार आहेत.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा, नंदकुमार यल्ला, राज्य अध्यक्ष उपेंद्र ठाकर, उपाध्यक्ष चंद्रकांत कोंडगुळे, सचिव रमाकांत साळुंखे, देवेंद्र औटी, व्ही. डी. गायकवाड, बळिराम एडके, प्रा. मोहनदास गुमते, प्रा. सोमेश बडदाळ, सुर्यकांत शिवशरण, वेणूगोपाळ शेट्टी, रवींद्र गोयल आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.