रायगड

रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पुरुष उमेदवारांच  मैदानी चाचणी

रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी न झालेल्या पुरुष उमेदवारांनी  मैदानी चाचणी करीता उपस्थित राहावे 

रायगड :- रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 391 (09 बॅन्डस्मन पदे समाविष्ट) व पोलीस शिपाई चालक संवर्गातील 31 रिक्त पदे भरण्याकरीता सन 2022-2023 ची भरती प्रकीया    दि. 21 जून 2024 रोजीपासून सुरु आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी न झालेल्या पुरुष उमेदवारांनी सोमवार, दि.29 जुलै 2024 रोजी सकाळी 06.00 वा.मैदानी चाचणीकरीता जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता. अलिबाग, जि.रायगड येथे उपस्थित राहावे  असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

दि.21 जून 2024 ते दि.23 जुलै 2024 या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. या कालावधीत पावसामुळे, एकाच दिवशी व लागोपाठचे दिवशी दोन पदांकरीता मैदानी चाचणीसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणांमुळे ज्या पुरुष उमेदवारांनी अद्यापपर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिली नाही, अशा पुरुष उमेदवारांना संधी/मुभा देण्यात येत आहे.

पुरुष उमेदवार यांना ही शेवटची संधी देण्यात येत असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही. दि. 29 जुलै 2024 रोजीनंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button