राज्य सरकारचे धोरण म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, शेतकऱ्यांना आधार द्या संभाजी ब्रिगेडची मागणी

बार्शी : शेतकऱ्यांना आधार द्या उत्तर सभा न घेता महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळ ग्रस्त आहेत त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चौकशी करा शेतकऱ्यांना आधार द्या हे करायचं सोडून सरकारमधील मंत्री प्रश्न आणि उत्तर सभा घेत फिरत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे सर्वसामान्याचं सरकार म्हणून मुख्यमंत्री नेहमीच उल्लेख करतात त्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आर्थिकक मदत करावी सध्याचं सरकारचं धोरण म्हणजे पालट्या घड्यावर पाणी आहे असे सांगून संभाजी ब्रिगेडने बार्शी तहसील कार्यालयासमोर पालथ्या घागरीवर पाणी ओतण्याचा अनोख आंदोलन केलं .चालू वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांची शालेय व परीक्षा फी माफ करावी शेतकऱ्यांना तात्काळ 10 शेळी 100 कोंबड्या सारखी मदत करून त्यांचा उदरनिर्वाच साधन उपलब्धब्ध करून द्यावा व अन्य मागणी आमच्या लवकरात लवकर मान्य कराव्या अन्यथा आंदोलन उग्र करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद यांनी पालथ्या घागरीवर पाणी या प्रकारचे आंदोलन करून दिला. शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती असताना देखील कांदा पिकवलेला आहे त्या कांद्याला योग्य मोबदला मिळायचं सोडून त्या कांद्यावरती सरकारनेनिर्याती वरती 40% कर लागला आहे म्हणजे ही जुलमी राजवट असल्यासारखे शेतकऱ्यांची भावना झाली आहे .ज्याच्यामुळे कांद्याचे भाव पडले आज आम्ही सरकारला 16 कलमी कार्यक्रम देतोय की ज्याच्यामुळे शेतकरी आर्थिक सदन होईल या सर्व मागण्या लवकरात लवकर मागण्या कराव्या अन्यथा आंदोलन या पुढील काळात उग्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
महेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
विद्यार्थी सेनेच्या वतीने पांडुरंग घोलप यांनी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रवक्ता आनंद गवळी यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास सरकारला शेतकरी वाऱ्यावर सोडील ही गोष्ट सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे असा इशारा यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सुवर्णा शिवपुरे यांनी शेतकऱ्यांचे हाल कराल तर तुमचे देखील शेतकरी हाल केल्याशिवाय राहणार नाहीयासाठी राष्ट्रवादी जिवाच रान करेल असा इशाराा दिला.
यावेळी गणेश सावळे बापूसाहेब घोलप अनंत चौधरी उज्वल पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने बार्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलनावेळी उपस्थित होते.