बदलापूर- सन २०२४-२५ या वर्षाच्या राज्य पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन बदलापूर येथे करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धांचे यजमानपद ठाणे जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनने स्विकारले आहे. उपरोक्त स्पर्धेचे सर्व आयोजन आपले लोकप्रिय शिक्षक मतदार संघाचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे “स्व स्वर्गवासी केशव दाद म्हात्रे करंडक” या शिर्षकाखाली करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन च्या मान्यतेने शिवभक्त क्रीडा मंडळ नवीन वडवली बदलापूर व ठाणे जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या सौजन्याने शिक्षक मतदार संघाचे क्रीडाप्रेमी, कार्यसम्राट मा. आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या संपूर्ण सहकार्याने व प्रेरणेने दि. ७ डिसेंबर दुपारी ०२ वाजता ते ०८ डिसेंबर २०२४ या कालावधीत उपरोक्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील डायरेक्ट व्हॉलीबॉल चे नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी सर्व क्रीडा रसिकांना मिळणार आहे. उपरोक्त स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष व सचिव कसून काम करत आहेत. आयोजकांकडून सदर स्पर्धांमध्ये सर्वांचा सन्मान केला जाणार आहे तसेच विजेत्या संघांना व गुणवंत खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येईल व अजून काही आर्थिक, सामाजिक मदत लागेल ती मी असोसिएशन ला करिन असे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बैठकीमध्ये जाहीर केले आहे. महाराष्ट्र अध्यक्ष श्री. डी. बी. साळुंके यांनी सुद्धा जाहीर केले की आपल्या लोकप्रिय, दानशूर, सगळ्यांना समजून घेणारे कार्यसम्राट आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जो विश्वास आमच्यावर टाकलाय तो मी व माझ्या असोसिएशन चे पदाधिकारी आम्ही सार्थक करून दाखवू आणि स्पर्धा उत्कृष्ट अश्या पार पाडू. सर्व जिल्ह्यांनी यांत सहभाग घ्यावा. दि. ७ डिसेंबर पासून बदलापूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निरपेक्षपणे निवडले जातील. ते संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेसाठी भारतातील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. बदलापूर करांसाठी असे भारतीय व्हॉलीबॉल खेळाडू पाहण्याची नामी संधी आपले लाडके लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपलब्ध करून दिली आहे. स्पर्धा उत्कर्ष परपडण्यासाठी महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल अध्यक्ष डी. बी. साळुंखे सर व महाराष्ट्र सेक्रेटरी श्री दिपकजी मोकल सर मागील दोन दिवसांपासून बदलापूर येथे राहून स्वतः सर्व बाबींचा आढावा घेत आहेत. स्पर्धा पार पाडण्यासाठी शिवभक्त क्रीडा मंडळ कार्यकर्ते व डायरेक्ट व्हॉलीबॉल अशोसीएशन चे सर्व पदाधिकारी जातीने लक्ष घालत आहेत.
न भूतो न भविष्य अशी राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आम्ही ठाणे जिल्ह्यात बदलापूरला करून दाखवू.
श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे
आमदार शिक्षक मतदार संघ



More Stories
गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित एम.फिल. अर्हताधारकांचा प्रश्न सोडवल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार
नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पेण येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबीर