सोलापूर

पालकमंत्र्यांची दिशाभूल करून लोकप्रतिनिधींनी कालव्यातील आवर्तन लांबवले, शेतकऱ्यांचा आक्रोश:कालव्याचे पाणी बंद करा

बेंबळे : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांची जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी दिशाभूल करून व जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव आणून उजनी कालव्याचे आवर्तन लांबवण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा दूरदृष्टीचा अभाव असलेल्या लोकप्रतिनिधीमुळे उजनी लाभक्षेत्रातील किमान 11 ते 12 लाख एकर क्षेत्राला 15 मार्च 24 पर्यंत रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनाचे मिळणारे कालव्यातील पाणी मिळण्याच्या आशा आता मावळूलागल्या आहेत व  एक नोव्हेंबर 23 ला सुटलेले कालव्यातील पाणी दोन ते तीन डिसेंबरला  बंद करण्याचे व 15 फेब्रुवारी 24 चे दरम्यान पुन्हा रब्बीचे दुसरेवर्तन सुरू करण्याचे कालवा समितीच्या बैठकीत ठरलेले असताना या निर्णयाला हरताळ फासण्याचे काम जिल्ह्यातील काही मोजक्या लोकप्रतिनिधी केले असून यामुळे राज्य शासना बद्दल लाखो शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाल्या असल्याचे सध्या सर्वत्र स्पष्ट दिसून येत आहे, त्यामुळे कालव्यातील पाणी तातडीने बंद करून पुढे निर्माण होणाऱ्या’ पाणी-आणीबाणीचा’ विचार करणे  व कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रब्बीचे दुसरे आवर्तन व्यवस्थित पुरेसे देण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी हजारो- लाखो शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
वृत्तांत असं की 2023 च्या पावसाळ्यात पुणे जिल्हा व धरण लाभ क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे 15 ऑक्टोबर 23 रोजी उजनी धरणात फक्त 60.66% पाणीसाठा अधोरेखित करण्यात आला व त्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत एक ते 30 नोव्हेंबर पर्यंत शेतीसाठी कालव्यातून रब्बीचे पहिले आवर्तन व 15 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत रब्बीचे दुसरे आवर्तन देण्याचे ठरवण्यात आले. पहिल्या आवर्तनामुळे शेतात उभी असलेल्या पिकांना जीवदान जरूर मिळाले परंतु एक ते दोन डिसेंबर रोजी बंद होणारे कालव्याचे पाणी जिल्ह्यातील  कांही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करून पाणी कालावधी वाढवण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले हे लपून राहिलेले नाही,त्यामुळे डिसेंबरचा शेवटचा आठवडा आला तरी अद्याप पाणी कालव्यातून चालूच आहे आणि पाणी बंद करा म्हणून शेतकरी टाहो फोडत आहेत कारण धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला असून रब्बीचे दुसरे आवर्तन पूर्णपणे मिळते की नाही अशी शंका उपस्थित झाली आहे,त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि शासनाच्या विरोधात पूर्ण नाराजी व्यक्त होत आहे. सध्या उजनीची पाणी पातळी 20 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे व आणि  कालवा सुरूच आहे ही शोकांतिका आहे, तसेच धरणामध्ये एकूण 74 टीएमसी पाणीसाठा असला तरीही उपयुक्त पाणीसाठा फक्त 10 टीएमसी राहिलेला आहे व यातून दररोज हजारो क्युसेक्स  पाण्याचा उपसा होत आहे त्यामुळे धरणाची पातळी झपाट्याने खालावू लागली आहे.
…….25 डिसेंबर च्या आसपास सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे ,या वेळी साडेपाच ते सहा टीएमसी पाणी कमी होणार असून  किमान 12% पाणीसाठा कमी होणार आहे व धरण ‘मायनस’ च्या जवळ पोहोचणार आहे व त्यानंतर दररोज  हजारो क्युसेक्स उपसा होणाऱ्या  पाण्याच्या  विचार करता दुसऱ्या आवर्तनाला पाणी कमी पडणार असा अंदाज दिसून येत आहे आणि याच भीतीने शेतकरी धास्तावला आहे, जलसंपदाच्या अधिकाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button