टेंभुर्णी : चव्हाणवाडीतील राजमुद्रा प्रतिष्ठानच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल राजमुद्रा प्रतिष्ठानच्या कट्ट्यावरती प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व पेढे भरून व गुलाबाची मुक्तपणे उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना तुकाराम ढवळे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची एकजूट सरकारला दाखवून दिली जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले असून ह्या आरक्षणाचे सर्व श्रेय मराठा एकजुटीला जाते. म्हणूनच आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिण्याचा दिवस म्हणून गणला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी या कार्यक्रमा वेळी दिली.
यावेळी या परिसरातील हजारोच्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते जय जिजाऊ, जय शिवराय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आशा घोषणा देत परिसर दणाणून गेला होता या आरक्षणाचे साक्षीदार असलेले तुकाराम ढवळे, विजय खटके, गणेश व्यवहारे, सचिन पवार, दादासाहेब नांगरे, व नितीन नांगरे हे आंदोलन करते टेंभुर्णी ते मुंबई पायी प्रवास करून आरक्षणचे साक्षीदार आहेत म्हणून त्यांचा या प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण नांगरे यांनी केले. तर आभार विशाल इंदलकर यांनी मानले.




More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम