महाराष्ट्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा तृतीय पंथीला लाभ मिळावा अशी मागणी तृतीयपंथी जगदीश शिंदे यांनी केली

मोहोळ : नवीन सुरु झालेली योजना मुंख्यमंत्री माजी लाउकी बहीण योजनेसाठी य २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यकत्या आणि निराधार महिला यांनाचा लाभ मिळणार मग आम्हा तृतीय पंथीला योजनेचा लाभ मिळणार आहे का? अशी प्रतिक्रिया तृतीयपंथी जगदीश शिंदे व गुरु आशा पुजारी यांनी केली.
आम्ही दररोज मागून आमचे पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज एक गावामध्ये मागत फिरत आहोत आम्हाला शासनाचा कोणताही लाभ दिला जात नाही तसेच आम्ही रोडवर उभारून वाहनाकडून किंवा दुकानदाराकडून पोटासाठी जेवढे देईल तेवढे पैसे घेत आहोत त्यावढ्याच आम्ही दररोजचा दिवस काढत आहोत आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्ये आम्हा तृतीय पंथीचा सहभाग करून घ्यावा व या योजनेमध्ये सहभाग करून त्याचा लाभ देण्यात यावा .
आम्हा तृतीय पंथीना शासनाने या योजनेचा लाभ द्यावा व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचा आम्हाला दरमहा १५oo / – रुपये दिले जावे अशी प्रतिक्रिया तृतीयपंथी जगदीश शिंदे गुरु आशा पुजारी हे मुंबई चेंबूर येथील राहिवाशी आहेत ते मोहोळ येथे त्यांच्या वैयक्तीक कामासाठी आल्यावर त्यांनी त्यांची खंत दै शिवनिर्णय च्या प्रतिनिधी जवळ व्यक्त करण्यात आली.