टेंभुर्णी : टेंभुर्णी तालुका माढा येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते अमरसिंह शेंडे यांची नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड केली असून या निमित्ताने मिटकलवाडी येथील गावकऱ्यांनी अमरसिंह शेंडे यांचा टेंभुर्णी येथील कार्यालयात यथोचित सन्मान केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमरसिंह शेंडे यांनी सत्कारला उत्तर देताना म्हणाले की गावातील काही विकासकामां बद्दल मदत हवी असेल तर तशी कल्पना देत चला तुमच्या कोणत्याही अडीअडचणींना मी तुमच्या पाठीशी उभा असेल.
यावेळी विश्वजीत सुरवसे, दत्तात्रय सुरवसे, शिवाजी सुरवसे, प्रदीप पाटील, सुजित सुरवसे, दीपक देवकर ,सोनल देवकर, सचिन श्रीखंडे, नितीन मिटकल, धनाजी मिटकल, तुषार मिटकल, हनुमंत मिटकल, सोमनाथ मिटकल, किरण राजगिरे, दादा राजगिरे, दत्ता टोणपे, पिकू कोळी , गणेश जाधव व अमरसिंह शेंडे यांच्यावर प्रेम करणारा परिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.




More Stories
राजन पाटील यांच्या मंत्रीपदामुळे पाटील घराण्याचे राजकीय वर्चस्व सिध्द होणार का ?
Karjat Election 2024: अपक्ष उमेदवार सुधाकर घारे इतिहास घडवणार?
लोकसभा निवडणूकीत तुम्ही मला साथ दिलात, भविष्यात मी तुम्हाला नक्कीच साथ देईन : खा. प्रणितीताई शिंदे