माढा विधानसभेचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांच्या विजयाने टेंभुर्णी मध्ये जल्लोष

शिव निर्णय/टेंभुर्णी / धनंजय भोसले : सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा विधानसभेत अभिजीत पाटील यांनी मारली बाजी. माढा विधानसभेवर तीस वर्षे एक हाती सत्ता असलेले आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांना मात्र या माढा विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सात ते आठ फेऱ्या वगळता शेवटच्या फेरीपर्यंत अभिजीत पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसत होते. अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभेवर आपला कब्जा दाखवत तीस वर्षाची सत्ता संपुष्टात आणल्याची सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या विरोधात 30 204 मतांनीअभिजीत पाटील विजय घोषित झाल्याचे समजताच टेंभुर्णी व परिसरामध्ये फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची मुक्तपणे उधळण करीत कार्यकर्ते “अभिजीत आबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” चा नारा देत होते. टेंभुर्णी मध्ये त्यांच्या स्वागतासाठी डी.जे.व जेसीबी मिरवणुकीसाठी लावण्यात आले होते. कार्यकर्ते मोटार सायकल रॅली काढून आनंद उत्सव साजरा करीत होते. या आनंद उत्सव रॅलीमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह जास्त दिसून आला. आज टेंभुर्णी मध्ये चौका चौकात आमदार अभिजीत पाटील यांच्याच नावाची चर्चा झाल्याची दिसत होती. माढा तालुक्यावर तीस वर्ष सत्ता असलेले आमदार शिंदे यांना मात्र वर्षाला 1000 मते घटल्याचे आमदार अभिजीत पाटलांच्या कार्यकर्त्यातून सांगण्यात आले. न भूतो न भविष्य असा हा विजय असल्याचे कार्यकर्त्या मधून दिसून येत होते. या विजयी मिरवणुकीमध्ये टेंभुर्णीतील नाना भैया युवा मंच सर्व कार्यकर्ते, कुटे पार्टीतील सर्व कार्यकर्ते, ऋषिकेश बोबडे गटातील सर्व कार्यकर्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व काँग्रेस आयचे सर्व कार्यकर्ते मित्र पक्षाचे कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये सामील होते.
चव्हाणवाडी (टे) येथे आमदार अभिजीत पाटील यांच्या विजयाची रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. या रॅलीची सांगता राजमुद्रा कट्ट्यावरती करून सर्व कार्यकर्त्यांनी पेढे भरवून फटाक्यांची आतिश बाजी व गुलालाची मुक्तपणे उधळण करीत आनंद साजरा केला.