महाराष्ट्र

 माढा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल..

 माढा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १४ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी५८१ तर पंधरा सरपंचपदासाठी १०४अर्ज दाखल झाले आहेत तर टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे यासाठी या निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा सर्वपक्षीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय फिरवल्याने तेथे आता ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे
      गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूकीच्या प्रतिक्षेत असलेल्या माढा तालुक्यातील रोपळे (क) (४)३३ तुळशी(७)३७, आढेगाव (५)२९, चांदज (६)३५,वडोली(९)४२, कन्हेरगाव(६)३८, लोणी नाडी(७)३०,मुंगशी(५)१५, अंजनगाव खे(५)३२,अंबाड(३)२१, पिंपळनेर(११)४२, पिंपळखुंटे(१२)५६, वडशिंगे(९)३३ व टेंभुर्णी (९)१३४या  प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत  या शिवाय टाकळी टे, तडवळे म या दोन ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे यासाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर वेणेगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत  येथील सरपंच पदाची पोट निवडणूक असली तरी सरपंच जनतेतून निवडला जाणार आहे
   महाविकास आघाडीच्या कार्यकाळात टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे यासाठीचा प्रस्ताव निर्णय प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात असताना राज्यात सत्तांतर झाले आणि हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे येथील ग्रामस्थांनी नगरपंचायतीस पसंती दिली आहे असे असताना आता या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत आहे आता येथे ग्रामपंचायत निवडणूक झाल्यास नगरपंचायत घोषित होण्यास आणखी विलंब होऊ शकतो हे लक्षात घेऊन येथील निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी दाखवली होती मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास केवळ अर्धा तास राहिला असताना येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची एकच झुंबड उडाली त्यामुळे वेळ संपण्यापूर्वी  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रांगेत असणारांना टोकन देऊन अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button