महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत
रायगड :-रायगड जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज दि.31 जुलै 2024 पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहेत.
रायगड जिल्ह्याच्या अधिनस्त अनु.जाती करीता सध्या 7 शासकीय वसतिगृहे पुढीलप्रमाणे कार्यरत आहेत. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, महाड गोकुळ विहार, चवदार तळे ता.महाड, अनु.जाती 4, अनुसूचित जमाती 0, भटक्या विमुक्त जमाती 2, आर्थिकदृष्या मागास 0, विशेष मागासवर्गीय 0, अपंग 2, अनाथ 1, एकूण रिक्त जागा-9.
मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, महाड, जि. रायगड तालुका पोलिस स्टेशनजवळ, नवेनगर, अनु.जाती 13, अनुसूचित जमाती 3, भटक्या विमुक्त जमाती 1, आर्थिकदृष्या मागास 0, विशेष मागासवर्गीय 0, अपंग 2, अनाथ 2, एकूण रिक्त जागा-21.
मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकिय वसतिगृह पाली-सुधागड,यांचे कार्यालय मधली आळी,राम मंदीर रोड,पाली-सुधागड अनु.जाती 54, अनुसूचित जमाती 2, भटक्या विमुक्त जमाती 0, आर्थिकदृष्या मागास 2, विशेष मागासवर्गीय 2, अपंग 2, अनाथ 0, एकूण रिक्त जागा-62.
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल,सेक्टर 10,प्लॉट नंबर 21 ग्रीनपार्क सोसायटी समोर अनु.जाती 4, अनुसूचित जमाती 0, भटक्या विमुक्त जमाती 2, आर्थिकदृष्या मागास 0, विशेष मागासवर्गीय 0, अपंग 2, अनाथ 1, एकूण रिक्त जागा-9.
मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, अलिबाग, गणेशमंदीर शेजारी, विजय नगर,वरसोली-अलिबाग अनु.जाती 53, अनुसूचित जमाती 1, भटक्या विमुक्त जमाती 1, आर्थिकदृष्या मागास 2, विशेष मागासवर्गीय 1, अपंग 1, अनाथ 2, एकूण रिक्त जागा-61.
मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकिय वसतिगृह अलिबाग,गोंधळपाडा- अलिबाग अनु.जाती 57, अनुसूचित जमाती 0, भटक्या विमुक्त जमाती -1, आर्थिकदृष्या मागास 4, विशेष मागासवर्गीय 1, अपंग 2, अनाथ 2, एकूण रिक्त जागा-65.
मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह बोरघर-हवेली, तालुका क्रीडा संकुलाजवळ, बोरघर-हवेली,ता. तळा अनु.जाती 69, अनुसूचित जमाती 2, भटक्या विमुक्त जमाती 4, आर्थिकदृष्या मागास 1, विशेष मागासवर्गीय 1, अपंग 2, अनाथ 2, एकूण रिक्त जागा-81.
वसतिगृह प्रवेशाकरीता आरक्षणाचा तपशिल – अनु.जाती – 80 % अनु.जमाती – 3 % विमुक्त जाती, भटक्या जमाती – 05% विशेष मागास प्रवर्ग – 02 % आर्थिकदृष्टया मागास – 5 % अनाथ – 3 % अपंग – 2 %
वसतिगृह वैशिष्टये– मोफत निवास व भोजन व्यवस्था,. शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वहया, पुस्तके, शैक्षणिक व महाविदयालयीन प्रवेशिततांकरिता लेखन साहित्याकरिता रु.4000/- शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.600/-निर्वाहभत्ता जिल्हापातळीवर रु.500/-निर्वाहभत्ता तालुका पातळीवर,.शालेय/महा. शालेय/महाविदयालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेश भत्ता,.प्रोजेक्ट रिपोर्ट/शै.सहल भत्ता,अॅप्रन भत्ता इ.
ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रियाबाबत माहिती– शासकीय वसतिगृहाचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.दिनांक 31/07/2024 ते 30/08/2024 पर्यंत अर्ज भरावे. ऑनलाईन भरलेल्या अर्ज पोर्टलवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंट घेऊन संबंधीत गृहपाल यांच्या कडे खालील कागदपत्रा सह ऑफलाईनरित्या सादर करणे आवश्यक आहे.
प्रवेशपात्र विद्यार्थ्याच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु. जाती,व जमाती विद्यार्थ्यांकरिता, रु.2,50,000/-चे आत व विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय,विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया, मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता रु.1,50,000/- चे आंत असावे. अर्जासोबत तहसिलदार यांचे सहीचा सन 2024-25 मधील उत्पन्नाचा दाखला. जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, बँक खाते क्रमांक, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असावे. विद्यार्थ्यांचा इमेल असणे आवश्यक आहे. आधार कार्ड हे मोबाईल नंबरला लिंक असावे. अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांचे कार्यालय, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंटमेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे अथवा संबधित गृहपालांशी संपर्क साधावा.