महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी बारकोड स्कॅन करुन महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करावी
रायगड, : रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी सरासरी 25 हजार ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करून योजनेचा लाभ घेत असून महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी बारकोड स्कॅन करुन महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती न मिळाल्याने शिष्यवृत्ती पासून वंचित राहतात. महाविद्यालयस्तरावरून प्रसिध्द होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका (Broucher), Whatsapp Group, Twitter, Facebook.Instagram व सबंधित वेबसाईट/पोर्टल/मोबाईल अॅप या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांनी अंतिम प्रवेश घेतलेल्या तारखेपासून पुढील एक महिन्याच्या आत महाडिबोटी पोर्टलवर शिष्यवृत्तीकरीता परीपूर्ण अर्ज भरण्यासाठी राज्यशासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in, या पोर्टलवर जाऊन प्रवेश प्रक्रीयेसाठी योजनेच्या निकषानुसार ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करावे.
त्यामुळे शिष्यवृत्ती अभावी पुढील शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी कळविले आहे.