शिव निर्णय /सोलापूर : महाबँक पेन्शनर क्लबच्यावतीने मंगळवारी (ता. २८) रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाला ७४ वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. या निमित्ताने, संविधानाने नेमके आपल्याला काय दिले ? या विषयावर धाराशिव येथील विधिज्ञ देविदास वडगावकर यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचासुद्धा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे व आपले संविधानावरील तसेच लोकशाहीवरील प्रेम व्यक्त करावे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता समाज कल्याण केंद्र सभागृहात होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसाद अतनूरकर, दीपक दाबडे, रवींद्र खमितकर, खंडू फुलसे यांनी केले आहे.



More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी