महाराष्ट्र
महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णीचे वर्शिक स्नेसंमेलनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
टेंभुर्णी :-
महात्मा फुले प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेसंमेलनचे उद्घाटन पंचायत समितीचे मा.सदस्य वैभव कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्याचा सन्मान विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. आज 26 नोव्हेंबर रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभगाचा कार्यक्रम आहे.
यावेळी अनेक मराठी, हिंदी सिनेमातील गीतावर मुले दंग झाली होती. के. जी. तसेच प्राथमिकमधील मुलांनी आकर्षक अभिनय सदर करून उपस्थित पालकांचे मनोरंजन केले. पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हिंगमिरे, हजारे, साठे यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी संस्थेचे संस्थापक नारायण भानवसे, संचालक केशव माळी, ट्विंकल स्टार चे संस्थपक हरिश्चंद्र गाडेकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष धनाजी भरगंडे, याचबरोबर अनेक पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सूत्रसंचालन सोनाली भोसले व मंगल नाईकनवरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शोयब बागवान, प्राचार्य विजय यादव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल बस कमिटीचे सदस्य, सर्व समितीचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.