महाराष्ट्र

मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडणार भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा

मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडणार भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा
सोलापूरकरांसाठी विभाजन स्मृती दिवस व स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संचार ब्युरो व मध्य रेल्वे सोलापूर यांचा विशेष उपक्रम
प्रदर्शन तीन दिवस सर्वांसाठी खुले
तिरंगा ध्वजासोबत काढता येणार सेल्फी

सोलापूर. दि. १३ : भारतीय स्वातंत्र्य महोत्सव, हर घर तिरंगा आणि विभाजन विभिषिका स्मृति दिवस निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि मध्य रेल्वे सोलापूर विभाग यांच्या वतीने दि 14 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये सोलापूर रेल्वे स्टेशन मधील जनरल तिकीट खिडकीच्या जवळील जागेत भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वपूर्ण घटना वर आधारित तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे खासदार माननीय प्रणिती शिंदे यांच्या हस्ते 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी १०.४५ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशू माली कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, विभागीय कार्मिक अधिकारी ए पी भगत,  जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, भारतीय सैन्य दलातील अधिकारी आणि रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सदर प्रदर्शनामध्ये 1857 ते 1947 पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना, ऐतिहासिक स्थळे, सोलापुरातील चार हुतात्मे, सेल्फी बूथ, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूर सहित माहिती असणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल रेल्वे प्रवासी आणि सामान्य नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी व युवकानी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button