राजकारण

मराठा समाजाला टिकणार आरक्षण तर धनगर समाजालाही आरक्षण मिळावे आ.राम सातपुते यांची सभागृहात मागणी

पिलीव : मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळालं पाहिजे तर याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात अग्रक्रमानं असणाऱ्या धनगर समाज बांधवांना ही आरक्षण देऊन न्याय दिला पाहिजे अशी भूमिका माळशिरसचे आ राम सातपुते यांनी गुरुवारी रात्री सभागृहात मांडली .
यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आ राम सातपुते म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा समाज ही शेती करून आपली उपजीविका करीत आहे परंतु शेतीत उद्भवणाऱ्या समस्यामुळे मराठा समाज हताश आहे .यामुळे मराठा समाजाचे राज्यभर आंदोलन सुरू आहे .मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळाले पाहिजे. या अगोदर मराठा आरक्षणासाठी कोणीच काही केलेले दिसून येत नाही .1960 पासून राज्यात वेगवेगळे मुख्यमंत्री झाले परंतु मराठा आरक्षणासाठी व मराठा समाजासाठी कोणीही भरीव काम केलेले दिसून येत नाही .मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथी संस्था आणली .यामुळे अनेक विद्यार्थी आयएएस ,आयपीएस झाले.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची नुसती घोषणा न करता भरीव निधीची तरतूद करून एक सक्षम अध्यक्ष देण्याचे काम व मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले . मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी आंदोलन ,आमरण उपोषण ,साखळी उपोषण असे आंदोलने करीत असून माझी सरकारला विनंती आहे की मराठा समाजाच्या या भावना सकारात्मकपणे विचारात घेऊन मराठा समाजाला टिकणार आरक्षण सरकारने द्यावे .
याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावगाड्यातील अग्रक्रमाने गणला जाणारा समाज म्हणून धनगर समाज बांधव आहेत. धनगड आणि धनगर या शब्दातील गफलतीमुळे धनगर समाज हे गावोगावी आरक्षणासाठी संघर्ष करतोय. या गोष्टीचाही सरकारने विचार करून धनगर समाज बांधवांनाही आरक्षण दिले गेले पाहिजे. मेंढपाळ समाज हा गावोगावी शेळ्या ,मेंढ्या स्वतःची लेकरं बाळ ,कोंबड्या घेऊन रानावनात भटकत असतो. यामुळे या समाजालाही आरक्षण देऊन न्याय दिला पाहिजे .त्यामुळे सरकारने धनगर बांधवांच्या आरक्षणाचाही तात्काळ विचार करावा व धनगर समाज बांधवांना आरक्षण द्यावे अशीही आग्रही मागणी सभागृहात आ. राम सातपुते यांनी केली.
    मराठा व धनगर आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेले आंदोलने पाहता माळशिरसचे आ राम सातपुते यांनी गुरुवारी रात्री जवळपास 11.30 वा दरम्यान सभागृहात धनगर व मराठा आरक्षणाबरोबरच इतर बहुजन समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. याबद्दल बहुजन समाज बांधवांबरोबरच मराठा व धनगर समाज बांधवांनी आमदार राम सातपुते यांचे विशेष आभार तर मानले परंतु सभागृहात आरक्षणाचा विषय लावून धरल्याने आ सातपुते यांचे बहुजन समाज बांधवांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button