सोलापूर दि.17 :- मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबधित व्यक्ती व संस्था यांनी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डीजिटल प्लॅटफॉर्म (एन.एफ.डी.पी) पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय रत्नाकर राजम यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसवंर्धक/ PMMSY लाभार्थी तसेच सर्व मच्छिमार सहकारी संस्था, मत्स्यव्यवसाय विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणेसाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डीजिटल प्लॅटफॉर्म (एन.एफ.डी.पी) पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. सदरची नोंदणी https://NFDP.dof.gov.in या लिंकवर स्वतः किंवा नजीकच्या सीएससी केंद्रात आधारकार्ड, बँक पासबुक यासह जाऊन विनामुल्य करता येईल. तसेच ई-श्रम कार्डसाठीची नोंदणी https://eshram.gov.in या लिंकवर करावी. अपघात गट विमा नोंदणीबाबतची 31 कॉलमची माहिती तसेच के.सी.सी बाबतची माहिती या कार्यालयात सादर करावी असेही सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय श्री.राजम यांनी कळविले आहे.



More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम